शाहरुख खान ज्याला आपण किंग खान म्हणून सुद्धा ओळखतो. त्याला भेटण्यासाठी , त्याची एक झलक मिळवण्यासाठी, त्याची फक्त एक नजर आपल्यावर पडावी म्हणून लोक वेडिपिसे होतात. त्यात जर त्याचा वाढदिवस असेल मग तर काही बघायलाच नको. परंतु एक विचित्र किस्सा शाहरुख खानच्या ह्या वर्षीच्या वाढदिवसाला घडला. दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी सुद्धा शाहरुख खानच्या बँड सटँड़ सारख्या आलिशान भागात असलेल्या मन्नत ह्या त्याच्या बंगल्याबाहेर शेकडो फ़ँस जमा झाले होते. शाहरुख आला त्याने हात केल्या शुभेच्छा स्वीकारल्या आणि तो निघून गेला. तो गेल्यानंतर जेव्हा सगळ्यांनी आपले खिसे तपासले तर अनेकांचे मोबाईल फोन्स गायब झाले होते. पोलिसांच्या मते चोरांनी लोकांच्या अति उत्साहाचा फायदा उचलला. आता पोलीस मन्नत च्या बाहेर असलेल्या सी.सी.टी.व्ही. कॅमेऱ्यांचे फुटेज तपासात आहेत.
चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews